Monday, December 13, 2021

6वी -खडक व खडकाचे प्रकार स्वाध्याय


 अ)   नदीमध्येवाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते

याविषयी माहिती घ्या.

उत्तर: नदीमध्ये पाणी प्रवाह सतत वाहत असतो. या पाण्याच्या प्रवाहामुळे नदी किनारी असलेल्या खडकांची झीज होते. पाण्याच्या वेगाने हे खडक फुटतात, त्यांचे छोटे छोटे तुकडे होतात. आणि हे तुकडे प्रवाह बरोबर वाहत जाताना त्यांचे बारीक कणांत रुपांतर होऊन बाळू तयार होते. अशा प्रकारे नदीमध्ये तयार झालेली वाळू ही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येते.

 ब) खालीलपैकी कोणकोणत्‍या वास्‍तू अग्निजन्य प्रकारच्या

खडकाने निर्माण केल्या आहेत ?


(१)            ताजमहाल      


(२)           रायगड किल्ला


(३)           लाल किल्ला


(४)          वेरूळचे लेणे


उत्तर:  रायगड किल्ला.


 


क)    फरक नोंदवा


१)    अग्निजन्य खडक व स्तरित खडक

अग्निजन्य खडक

स्तरित खडक

१)                अग्निजन्य खडक हे एकजिनसी दिसतात.

१)                स्तरित खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात.

२)               अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

२)स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात.

३)               अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात.

३)स्तरित खडक हे वजनाने हलके असतात.

४)             बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकांचे उदाहरण आहे.

४)वाळूचा खडक , चूनखडक, पंचाश्म, प्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहेत.

 

3) अग्निजन्य खडक व रुपांतरीत खडक

उत्तर:  

अग्निजन्य खडक

रुपांतरीत खडक

१)अग्निजन्य खडक कठीण असतात.

१)स्तरित खडक हे ठिसूळ असतात. 

२)अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

१)स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात.

३)अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात.

२)स्तरित खडक हे वजनाने हलके असतात.

४)बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकांचे उदाहरण आहे.

४) वाळूचा खडक चूनखडकपंचाश्मप्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहेत.




ड) महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात.


१) मध्य महाराष्ट्र

उत्तर: बेसाल्ट व ग्रेनाईट

२)दक्षिण कोंकण

उत्तर: ग्रेनाईट आणि जांभा खडक

३)विदर्भ

उत्तर: ग्रेनाईट

२)  स्तरित खडक व रुपांतरीत खडक

उत्तर:

स्तरित खडक

रुपांतरीत खडक

१)स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात.

१)रुपांतरीत खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

२)स्तरित खडक हे वजनाने हलके असतात.

२)रुपांतरीत खडक हे वजनाने जड असतात.

३ )स्तरित खडक हे ठिसूळ असतात.  

३)रुपांतरीत खडक हे कठीण असतात.

४) वाळूचा खडक चूनखडकपंचाश्मप्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहे

४) नीस, संगमरवर, हिरा, स्लेट ही स्तरित खडकांची उदाहरणे आहेत

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...