Monday, October 4, 2021

8 वी इतिहास स्वाध्याय लेखन

 

युरोप आणि भारत 

——————————————————————————————
प्रश्न १ला योग्य पर्याय निवडुन लिहा.
———————————

1) इ.सन. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी _________ हे शहर जिंकून घेतले

(अ) व्हेनिस        (आ) कॉन्स्टॅन्टिनोपल       (क) रोम             (ड) पॅरिस

उतर – (आ) कॉन्स्टॅन्टिनोपल

(2) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ______ मध्ये झाला.

(अ) इंग्लंड (ब) फ्रान्स (क) इटली (ड) पोर्तुगाल

उत्तर – (अ) इंग्लंड

(3) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न……….. याने केला.

(अ) सिराज उद्दौला (ब) मीर कासीम (क) मीर जाफर (ड) शाहआलम 

उत्तर — ब)मीर कासीम

———————————————————————————————

प्रश्न २ रा. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

  1. वसाहतवाद

एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच ‘वसाहतवाद’ होय.

2. साम्राज्यवाद

विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच ‘साम्राज्यवाद’ होय.

3.प्रबोधनयुग

युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात.

४) भांडवलशाही

नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.


प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट  करा,


(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 

➤कारण➤ भारतातील अत्यंत समद्ध अशा बंगाल प्रांतात इ.स.१०५६ साली सिराज उद्दौला हा नवाबपदी आला. मुघल बादशाहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी गैरवापर करत. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारल्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इ.स.१७५० मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. त्यावेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही. त्यामुळे प्लासीच्या लढाईत सिराज उद्योलाचा पराभव झाला.

२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.

 ➤कारण➤ इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टेंन्टिनोपल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात असे. हे व्यापारी मार्ग तुर्कानी बंद केले. त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले

३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. 

➤कारण➤ नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरूवात होऊन अनेक व्यापारी पुढे आले. परंतु एकट्या व्यापान्यास जहाजातून माल परदेशात पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असल्यामुळे या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.



No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...