Thursday, October 21, 2021

स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल |


बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल 

——————————————————

प्रश्न १ला :  थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) कायिक विदारण म्हणजे काय ?

उत्तर :- खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे, म्हणजे 'कायिक विदारण' होय. अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात  कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.



(आ) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर :-  कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत.


(१) कार्बनन  :- पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदा. पाणी + कार्बन डायऑक्साइड = कार्बोनिक आम्ल

२) द्रविकरण  :- मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.


(३) भस्मीकरण :-  ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर भस्मीकरण ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.


(इ) जैविक विदारण कसे घडून येते?

उत्तर :- जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळे, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडते.


ई) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :-  नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण होय. विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या

कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज होय. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे मुख्य प्रकार आहेत

प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.


(अ) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.

चूक 

योग्य विधान :- भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होत असतो.


(आ) आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.

बरोबर


(इ) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.

बरोबर


(ई) खडकाचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

बरोबर 

(उ) अपपर्णातून जांभा खडकाची निर्मिती होते.

चूक 

योग्य विधान : बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते.



प्रश्न ४. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.

(अ) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात 

जैविक विदारण


(आ) खडकातील लोहावर गंज चढतो.

रासायनिक विदारण


(इ) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.

कायिक विदारण


(ई) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.

कायिक विदारण


(उ) ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.

कायिक विदारण


प्रश्न ५. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर :- पावसाळ्यात हमखास घडणारी एक घटना म्हणजे भूस्खलन. भूस्खलन म्हणजेच माती घसरून पडणे. ही माती डोंगरकड्यांवरून घसरते किंवा एखाद्या उतारावरून. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून माळीण गावातील ४४ घरं जमिनीत गाडली गेली. बस चालकाला माळीणगाव मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. त्याने ही बातमी प्रशासनाला कळवली. एकसारखा दमदार पाऊस, अरुंद रस्ता, वाहनांची व बघ्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून एनडीआरएफ टीम ४०० जवान, डॉक्टर्स, नर्सेस सहित माळीण येथे दाखल झाली. सहा दिवसानंतर १२९ मृतदेह बाहेर काढण्यात आले, तरीही आणखी मतदेह जमिनीखाली होती.जवळजवळ संपूर्ण गाव मातीखाली गायब होण्याची ही राज्यातील पहिलीच दुर्घटना. पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगर उतारावरील शेतीला, जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले.अमेरिकेच्या अंतराळ यंत्रणा नासाने या दुर्घटनेच्या अगोदरच्या दिवशी २९ जुलै रोजी या घटनेसंबंधी सूचना दिली होती. नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर २९ जुलै रोजी सायंकाळी या भागात भूस्खलन होण्याचा धोका उघड करत हाय अलर्ट दिला होता. भीमाशंकरच्या डोंगराळ भागात 'पर्पल कोड' हा अलर्ट दिला होता. पर्पल कोड तेव्हा दिला जातो जेव्हा भूस्खलन असलेल्या भागात १७५ मिमी हुन  आधिक पावसाची नोंद होते. या भागांमध्ये माळीण गावाचा देखील समावेश होता. परंतु भारतात मात्र या अलर्टवर लक्ष दिले गेले नाही.

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...