Friday, December 10, 2021

सहावी ६)जनपदे व महजनपदे स्वाध्याय


 स्वाध्याय

१. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) जनपदे म्हणजे काय?

उत्तर: छोटी छोटी राज्ये म्हणजे जनपदे होय.

२) महाजनपदे म्हणजे काय?

उत्तर: काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले.

(३) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?

उत्तर: राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली.

 ४)    वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली?

उत्तर: नंद राजांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरु केली.

—————————————————

प्रश्न २रा.सांगा पाहु

(१) आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता.

उत्तर: आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापला होता.


 


(२) जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे.

उत्तर: जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची ‘गणपरिषद’ असे.


 


(३) ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई.

उत्तर: ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला संधागार  म्हटले जाई.


 


(४) गौतम बुद्ध गणराज्यातील होते.

उत्तर: गौतम बुद्ध  शाक्य गणराज्यातील होते.


५)    चतुरंग सैन्य


उत्तर: पायदळ , घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य असे.

————————————————————

प्र.३. जोड्या जुळवा.


(१) संगिती)— परिषद


(२) धनानंद)— नंद राजा


(३) पाटलीग्राम —अजातशत्रू

—————————————————


प्र.४. भारतातील विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा.

उत्तर:

राज्ये

राजधानी

आंध्रप्रदेश

हैदराबाद

अरुणाचल प्रदेश

इटानगर

आसाम

दिसपूर

बिहार

पटणा

छत्तिसगढ

रायपूर

गोवा

पणजी

गुजरात

गांधीनगर

हरियाणा

चंदिगड

हिमाचल प्रदेश

सिमला

जम्मू काश्मीर

श्रीनगर

जम्मू

झारखंड

रांची

तेलंगणा

हैदराबाद

पश्चिम बंगाल

कोलकत्ता

उत्तराखंड

डेहराडून

उत्तरप्रदेश

लखनौ

त्रिपुरा

आगळताळा

तामिळनाडू

चैन्नई

सिक्कीम

गंगटोक

राज्यस्थान

जयपूर

पंजाब

चंडीगड

ओडीसा

भुवनेश्वर

नागालँड

कोहिमा

मिझोरम

ऐझवाल

मेघालय

शिलॉंग

मणिपूर

इंफाळ

महाराष्ट्र

मुंबई

मध्यप्रदेश

भोपाळ

केरळ

तिरुंअनंतपूरम

कर्नाटक

बेंगळूरू

 

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...