Sunday, September 12, 2021

थोडा हटके कृतीयुक्त अभ्यास अपेक्षित उत्तरे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️कृतीयुक्त अभ्यास क्र.२२

▪️नाव:-

▪️इयत्ता:-६वी

▪️आजचा कृतीयुक्त प्रश्न-तापमान वाढीची बातमी शोधणे.

...............................................

▪️कृती:-

भारतातील सर्वाधिक तापमानांच्या शहरात अकोला दुसऱ्या क्रमांकावर, टॉप 10 शहरं कोणती?

    

निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर Publish Date - 1:39 pm, Wed, 27 May 20


मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना, सूर्यदेवही आग ओकताना पाहायला (Akola in top ten hottest city list) मिळत आहे. देशातील सर्वाधिक तापमानाच्या टॉप 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. मंगळवारी 26 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, राजस्थानातील चुरु इथे तब्बल 47.5 अंश सेल्सिअस इतकं देशातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं. त्याखालोखाल महाराष्ट्रातील अकोल्यातही तब्बल 47.4 इतक्या तापमानाची नोंद झाली. स्कायमेट या हवामान संस्थेने ही आकडेवारी जारी केली. (Akola in top ten hottest city list)

टॉप टेन ‘हॉट’ शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अकोला (47.4), तिसऱ्या क्रमांकावर नागपूर (47.0) तर चंद्रपूर (46.8) सहाव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातल ही तीन शहरं देशात टॉप टेन सर्वाधिक तापमानाच्या यादीत आहेत.

▪काय शिकायला मिळाले:- आपल्या महाराष्ट्रात अकोला व चंद्रपूर येथे जास्त तापमान असतो असे शिकायला मिळाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️कृतीयुक्त अभ्यास क्र.२२

▪️नाव:-

▪️इयत्ता:-७वी

▪️आजचा कृतीयुक्त प्रश्न-२००४ व २०११मध्ये झालेल्या त्सुनामीविषयी माहिती मिळविणे.

...............................................

▪️कृती:-

आधुनिक काळातील त्सुनाम्या

▪️ २००४ सालातील पश्चिम सुमात्रा (इंडोनेशिया) सुनामी :- २००४ इंडोनेशिया भूकंप आणि त्सुनामी

इ.स. २००४ मध्ये आग्नेय् आशियात हिंदी महासागरात सुनामी आली होती. डिसेंबर २६, इ.स. २००४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या लाटांमुळे सुनामी निर्माण झाली. या सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक नुकसानकारक सुनामी ठरली.

▪️इ.स. २०११ सालातील जपान सुनामी :- मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ८.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले.

▪काय शिकायला मिळाले:- त्सुनामी ही नैसर्गिक आपत्ती किती भयंकर असते याचा अंदाज आजच्या अभ्यासात आले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 ▪️कृतीयुक्त अभ्यास क्र.२१

▪️नाव:-

▪️इयत्ता:-६वी

▪️आजचा कृतीयुक्त प्रश्न:-साम शब्दाचा अर्थ,साम गायनाचे स्वरुप व सामतंत्र या बाबी शोधणे.

...............................................

▪️कृती:-

साम शब्दाचा अर्थ:-

साम शब्दाचा पहिला अर्थ प्रिय किंवा प्रियकर वचन असा आहे. कुठे कुठे गान या अर्थानेही तो प्रयुक्त आहे. प्रचलित सामवेदाला हाच अर्थ लागू पडतो. सा च अमश्चेति तत् साम्न: सामत्वम्‌। (बृहदारण्यक उपनिषद १.३.२२) सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे गांधारादी स्वर होत. दोन्ही मिळून साम होते.

सामगानाचे स्वरूप :-

सामगानात पदांच्या १ ते ७ अंकांनी संगीताच्या सात स्वरांचा निर्देश केला जातो. प्राय: अधिकांश मंत्रांमध्ये पाचच स्वर लागतात. सहा स्वरांनी गायिली जाणारी सामे थोडी आहेत आणि सात स्वरांची त्याहून थोडी आहेत.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️कृतीयुक्त अभ्यास क्र.२१

▪️नाव:-

▪️इयत्ता:-७वी

▪️आजचा कृतीयुक्त प्रश्न:गुरुगोविंदसिंगाच्या खालसा दलाविषयी माहिती मिळविणे.

...............................................

▪️कृती:-

२२ डिसेंबर १६६६—७ ऑक्टोबर १७०८). शिखांचे दहावे व अखेरचे गुरू. शिखांचे नववे गुरू तेगबहादुर हे यांचे वडील. आईचे नाव गुजरी. जन्म बिहारमधील पाटणा येथे. लहानपणी ‘गोविंदराय’ या नावाने ते ओळखले जात. त्यांनी दोन विवाह केले होते; जीतो व सुंदरी ही त्यांच्या पत्नींची नावे. अजितसिंग,जुझारसिंग, जोरावरसिंग व फतहसिंग ही त्यांची चारही मुले पुढे लढायांत मारली गेली.

गुरू तेगबहादुर यांच्या वधानंतर (१६७५) वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोविंदसिंग गादीवर आले. आपल्या प्रभावी नेतृत्वाने त्यांनी शीख समाज सुसंघटित केला व शिखांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. ‘खंडेदाअमृत’ नावाचा एक शिख दीक्षाविधीही त्यांनी सुरू केला. या दीक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे ‘सिंग’ ही उपाधी लावू लागले व ‘पंच ककार’ (केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण) धारण करू लागले. त्यांच्या अनुयायांना ‘खालसा’(म्हणजे अत्यंत शुद्ध) म्हणून संबोधले जाते. खालसा पंथाचे ते संस्थापक होत. आपल्या धार्मिक शिकवणुकीत त्यांनी एकेश्वरवादी मताचा पुरस्कार केला. शौर्य व राष्ट्रभक्ती या गुणांना त्यांनी आपल्या शिकवणुकीत अग्रस्थान दिले. आपल्या अनुयायांना लष्करी शिक्षण देऊन त्यांची एक शिस्तबद्ध फौज त्यांनी तयार केली व औरंगजेबाविरुद्धच्या अनेक लढायांत विजय मिळविले. आपल्यानंतर शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ⇨ग्रंथसाहिब यासच गुरुस्थानी मानावे, असा आदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.


▪काय शिकायला मिळाले:- शिख धर्मात सिंग ही उपाधी का लावतात ते या कृतीयुक्त अभ्यासात शिकायला मिळाले.

सामतंत्र:-

यात तेरा प्रपाठक असून, सामगायनाचा विधी, त्याचे संकेत आणि त्याच्या पद्धती यांचे हे वर्णन आहे. हे एका प्रकारचे सामवेदाचे व्याकरणच आहे.

▪काय शिकायला मिळाले:- सामवेदात स्वरांविषयी माहिती मिळाली.किती स्वर जास्त वापरली जातात.त्याविषयी शिकायला मिळाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️कृतीयुक्त अभ्यास क्र.२१

▪️नाव:-

▪️इयत्ता:-८वी

▪️आजचा कृतीयुक्त प्रश्न:-इतर ग्रहावरील व सूर्यमालेबाहेरील अस्तित्व शोधणे.

...............................................

▪️कृती:-

शुक्रावर ढगांचे आवरण आढळले असून तेथे सल्फर डायऑक्साइडचे घनदाट ढग आढळून येतात.हे  ढग स्तरीय प्रकारचे मेघ असून ज्वालामुखीय हालचालींमुळे तयार झाले आहेत. हे ढग ४५ ते ६५ किमी उंचीवर तीन मुख्य स्तरांमध्ये आढळतात आणि त्यामुळे शुक्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे जवळ जवळ अशक्य बनते. त्याखाली शुक्रावर कोणतेही राशीमेघ प्रकारचे ढग आढलेलेले नाहीत, परंतु वरील पातळीवर कधीकधी स्तरराशीमेघ प्रकारचे तुटक स्वरूपातील ढग आढळून येतात.

मंगळावर बहिर्गोल भिंगाकार (lenticular), तंतुमेघ, तंतुराशीमेघ  आणि पाण्यापासूनच्या बर्फाने बनलेले स्तरराशीमेघ असे काही प्रकारचे ढग बहुतांशी ध्रुवभागाजवळ आढळले आहेत.मंगळावर पाण्याचे बर्फ आणि त्यापासूनचे धुकेदेखील आढळले  आहे.

गुरू आणि शनि या दोन्ही ग्रहांवर उच्च स्तरावर अमोनियापासून बनलेले तंतुमेघ, मध्यस्तरावर अमोनियम हायड्रोसल्फाईडपासून बनलेलले  धुके सदृश्य स्तरीय मेघ, आणि निम्न स्तरावर जलकणांचे राशीमेघ आढळून येतात. तसेच गुरूच्या अंतर्भागात लाल ठिपक्याजवळ गर्जन्मेघ अस्तित्त्वात असल्याचे ज्ञात आहे.अशाच प्रकारचे ढगांचे आच्छादन  युरेनस आणि नेपच्यूनवर देखील आढळते परंतु हे आच्छादन मिथेनचे बनलेले आहे. शनिचा उपग्रह टायटनवर मिथेनचेच बनलेले तंतुमेघ आढळतात. कॅसिनी-ह्यूजेन्स शनि मोहिमेत शनीवरील ध्रुवीय स्तरीय ढगांचा आणि टायटनवरील मिथेन चक्राचा पुरावा सापडला आहे.

सूर्यमालेबाहेरील काही ग्रहांवरच्या वायुमंडलात ढगांचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. ऑक्टोबर 2013 मध्ये, केप्लर -7 बी ह्या सूर्यमालेबाहेरील ग्रहाच्या  वातावरणात उच्च स्तरावर घनदाट ढगांचे अस्तित्व घोषित करण्यात आले आहे. तसेच डिसेंबर 2013 मध्येही  जीजे 436 बी आणि जीजे 1214 बी ह्या ग्रहांच्या वातावरणात ढगांचे अस्तित्व जाहीर झाले आहे.

▪काय शिकायला मिळाले:- इतरही ग्रहावर ढगाचे अस्तित्व असतात ते आजच्या कृतीयुक्त अभ्यासात शिकायला मिळाले.




No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...