Friday, January 14, 2022

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

 स्वाध्याय 

प्र.१. सांगा पाहू.

(१) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे.

उत्तर: कुशाण


(२)  कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर.

उत्तर: कानिष्कपूर


(३)  वीणावादनात प्रवीण असलेला राजा.

उत्तर: समुद्रगुप्त


(४)   कामरूप म्हणजेच.

उत्तर: प्राचीन आसाम

.२. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्यासाम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा.

उत्तर: १) दिल्ली २) मगध ३) पटणा

 

प्र. ३. चर्चा करा व लिहा.

(१)    सम्राट कनिष्क

उत्तर: कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले काम्पूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने ‘बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’ हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता.


(२)    मेहरौली येथील लोहस्तंभ

उत्तर: दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात ‘चंद्र’ नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहेअसे मानले जाते.

 

प्र.४. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा.

उत्तर:

१)    बाणभट्ट : हर्षचरित

२)   अश्वघोष : बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’

३)   मिनँडर : ‘मिलिंदपञ्ह’

 

प्र. ५. गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा.

उत्तर:

मुद्दे

गुप्त राजघराणे

वर्धन राजघराणे

संस्थापक

श्रीगुप्त

प्रभाकरवर्धन

राज्यविस्तार

आसामपासून व पंजाब पासून ते कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टी असलेला प्रदेश तसेच माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र 

उत्तर दिशेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी आणि पुरेल आसाम आणि पश्चिम दिशेला गुराजारात पर्यंतचा प्रदेश.

कार्य

समुद्र गुप्ताने विविध प्रतिमा असलेलेई नाणी तयार केली होती.

व्यापाराची भरभराट झाली. इतर धर्मांना आश्रय दिला.



प्र.६ . पुढील शब्दकोडे सोडवा.

उभे शब्द

२. ¬¬¬¬¬ याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभलेखामध् आढळते.

३. मेहरौली लोहस्तंभावर ¬¬ नावाच्या राजाचा उल्ख ले आढळतो.

५. पुष्यवर्मन याने ¬¬¬¬ चे राज्य स्थापन केले.

७. ¬¬¬¬¬ याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता.

८.इंडोग्रिक  राजांमधील प्रसिद्ध राजा ¬¬¬¬.

आडवे शब्द

१. ¬¬¬¬¬¬¬ याने गुप्तांचे साम्राज्य वायव्कडे ये वाढवले.

४. हरवर्धनाचे एक संस्कृत नाटक ¬¬¬¬¬

६. गुप्त राजघराण्याचा संस्थापक ¬¬¬

९. ¬¬¬¬ हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला.

१०. दुसऱ्या चद्रगुंप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध  भिक्षु ¬¬¬¬

११. कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य ¬¬

उत्तर:

दु

रा

चं

द्र

गु

प्त

 

 

 

मु

 

द्र

 

 

 

 

 

 

द्र

 

 

प्रि

र्शि

का

श्री

गु

प्त

 

 

 

 

 

 

प्त

 

 

 

 

 

रु

 

 

 

र्ष

 

 

मि

 

 

प्र

भा

ती

 

नँ

 

 

 

 

 

र्ध

 

 

 

 

हि

या

 

 

No comments:

Post a Comment

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...