Thursday, December 16, 2021

विषुववृत्तीय प्रदेश-श्री ध्रुवास राठोड सर

 विषुववृत्तीय प्रदेश-जगाचा नकाशा



विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशात जास्त उष्णता असते. येथील सरासरी तापमान 27 अंश सेल्सियस असते. येथील हवामान वनस्पतीवाढीस अनुकूल असल्यामुळे या प्रदेशात अतिशय दाट वने आहेत. त्यांना सदाहरित वने असे म्हणतात


नैसर्गिक वनस्पती : विषुववृत्तीय प्रदेशात धनदाट सदाहरित वने आढळतात या वनांमधील वनस्पतींमध्ये भरपूर विविधता आढळते. या प्रदेशात ठिकठिकाणी दलदलयुक्त प्रदेश आढळतात या प्रदेशातील वृक्षांचे लाकूड कठीण असते. या प्रदेशात महोगनी, ग्रीन-हार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणावर दिसून येतात

मोहगनी वनस्पती:-


महोगनीच्या दोन उपजाती आहेत.स्पॅनिश महोगनी,होंडूरास महोगनी स्वीटेनिया महोगनी मायक्रोफायला साधारणपणे ६० फूट उंच वाढतो.याची वाढ तशी संथच आहे.स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायला त्यामानाने झपाट्याने वाढतो आणि जास्त कणखर आहे.हा साधारण ५० ते ७० फूट उंच वाढतो.स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायलाची पानं आकाराने थोडी मोठी,गडद हिरवी आणि चकचकीत असतात.महोगनीच्या पानगळीचा काळ फार थोडा असल्यामुळे अगदी निष्पर्ण अशी ही झाडं कधी दिसतच नाहीत.महोगनीचे खोडही अगदी लक्षात रहाण्यासारखे आहे.काळसर खोडाच्या सालीवर पडलेल्या भेगांमुळे सालीचे पापुद्रे निघतात आणि पूर्ण खोड खवले पांघरल्यासारखे दिसते. महोगानीची फुलं अतिशय लहान,हिरवट पांढरी असतात. लहान आकार आणि हिरवट रंगामुळे फुलांचे गुच्छ काही नजरेत भरत नाहीत.त्याच्या लांबट गोल,टणक फळामध्ये पातळ पंख असलेल्या बिया असतात. स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायलवर बरेच महिने हि फळं पहायला मिळतात.फळ फुटल्यावर आतल्या बिया वाऱ्याबरोबर पसरतात.दोन्ही प्रकारच्या महोगनींची लागवड बियांपासून करतात.दमट आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या हवामानात हि वाढतात.समुद्रकाठची खारी हवाही यांना मानवते.याचा खरा उपयोग फर्निचरसाठी होतो.टणकपण आणि लालसर रंग यामुळे महोगनीचं लाकूड फर्निचरसाठी उत्तम!मॅक्रोफायलाचं लाकूड जरा कमी प्रतीचं मानतात.याच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी होतो महोगनीचा गर्द लाल रंग यामुळे मिळतो.सालातून डिंकही मिळतो.जखमांवर ॲस्ट्रिंजंट म्हणून तसेच ताप वगैरे रोगांवर औषधी आहे.पण आपल्यासाठी याचा खरा उपयोग म्हणजे याची सागर्द वली होतो.



Wednesday, December 15, 2021

७वी नैसर्गिक प्रदेश-गवताळ प्रदेश

 

गवताळ प्रदेश



पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत कोरड्या हवेचे ओसाड, वाळवंटी प्रदेश आणि आर्द्र हवेचे अरण्यप्रदेश यांच्या दरम्यान, खंडांच्या अंतर्भागात मुख्यत:गवताने निसर्गतःच आच्छादलेले विस्तृत, सपाट मैदानी किंवा पठारी प्रदेश आढळतात. त्यांना उष्ण कटिबंधात सॅव्हाना व समशीतोष्ण कटिबंधात स्टेप व प्रेअरी म्हणतात.

दक्षिण आफ्रिकेत त्यांना व्हेल्ड, दक्षिण अमेरिकेत लानोज, कँपोज, पँपास, आणि ऑस्ट्रेलियात डाउन्स अशीही नावे आहेत. अंटार्क्टिकाशिवाय प्रत्येक खंडात असे विस्तीर्ण तृणप्रदेश आहेत.

ब्रिटिश बेटे, पश्चिम यूरोप, न्यूझीलंड इ. थंड प्रदेशांत मनुष्याने अरण्ये तोडली, तेथे लुसलुशीत हिरव्यागार गवताची कुरणे तयार झाली आहेत. वाळवंटी प्रदेशातही काही भाग तृणाच्छादित असतो. टंड्रा प्रदेश, बहुतेक पठारी प्रदेश आणि काही पर्वतांचे उतार येथेही प्राणी चरू शकतील असे गवत आढळते. तथापी मुख्यतः सॅव्हाना, स्टेप व प्रेअरी हेच विस्तीर्ण प्रदेश, गवताळ प्रदेश असे विशेषत्वाने मानले जाते.

पृथ्वीवरील जमिनीचा सु. २४ % भाग गवताळ प्रदेश आहे. त्यापैकी  ३१% प्रदेश विशेष उंच सॅव्हाना गवताचा, २२% उंच सॅव्हाना गवताचा, १८% ओसाड प्रदेशातील सॅव्हानाचा, १३% उंच प्रेअरी गवताचा, १०% बुटक्या स्टेप गवताचा व ६% पर्वतीय तृणप्रदेशाचा आहे.

तृणप्रदेशात झाडांपेक्षा गवतच वाढावे अशी नैसर्गिक परिस्थीती असते. पाऊस इतक्या बेताचा पडतो, की  त्याची ओल जमिनीच्या खालच्या थरांपर्यंत पोहोचत नाही, ती वरच्या थरातच राहते. ही गोष्ट झाडांपेक्षा गवताच्या वाढीला अधिक पोषक असते. प्रेअरीचा तृणप्रदेश जवळजवळ वृक्षहीनच आढळतो. परंतु येथील हवामान पाहता तेथे अरण्येही वाढू शकली असती. अर्जेंटिना, यूरग्वाय, पॅराग्वाय येथेही अरण्ये वाढण्याजोगी हवामानाची परिस्थिती आहे.

आफ्रिकेतील विस्तीर्ण सॅव्हाना तृणभूमीत जसे हवामान आहे तसे भारत, आग्नेय आशिया, मध्य अमेरिका येथेही आहे. परंतु या प्रदेशात त्या हवामानात अरण्ये वाढलेली आहेत. आफ्रिकेच्या आणि स्टेप प्रदेशाच्या गवताळ प्रदेशांत मात्र मधूनमधून काही थोडी झाडे दिसतात तेवढीच. याचे कारण मानवाची वस्ती आणि त्याने वापरलेला किंवा आपोआप उत्पन्न झालेला अग्नी.

. स. पू. १०००० वर्षांपूर्वींच मनुष्य काही प्राण्यांना माणसाळवून त्यांचे कळप बाळगू लागला होता. माणसाने बाळगलेले प्राणी मर्यादित प्रदेशात चरतात आणि तेथील गवत पार नाहीसे करतात. आफ्रिकेच्या वायव्येकडील पर्वतीय प्रदेशात माणसाने शेळ्या, मेंढ्या आणि उंट चारले नसते, तर तेथे अरण्य तयार झाले असते.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या नैऋत्य भागात प्राणी चारल्यामुळे त्या भागाचे मरुभूमित रूपांतर झाले आहे. भारतातही राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाच्या सीमेवर शेळ्या-मेंढ्या चारल्यामुळे वाळवंटी प्रदेश विस्तार पावत आहे आणि मरुभूमीचे हे आक्रमण थांबविण्यास तेथे मुद्याम गवताची लागवड करून प्राणी चारण्यास बंदी करण्यात येत आहे.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हरणे, गवे, हत्ती, घोडे वगैरे विविध प्राणी भरपूर होते, ते सापक्षतः अलीकडच्याच काळात माणसाने नष्ट केले. त्यामुळे तेथील गवत अधिक उंच वाढले. वणवा लागून ते गवत जळले तेव्हा लहान गवत जळल्यामुळे जांच्यावर विशेष परिणाम होत नव्हता, ती झाडेही नष्ट झाली आणि तृणभूमी वाढली.



Let's Learn English

 🦚 Important Collective Nouns With Marathi Meaning.🦚


01.  A staff - of teachers – शिक्षकांचा-वृंद


02.  A pair - of socks- पायमोज्यांची-जोडी


03.  A series - of events-घटनांची-मालिका


04.  A pile - of books -पुस्तकांचा-ढीग


05.  A library - of books- पुस्तकांचे - ग्रंथालय


06.  A gang - of thieves – चोरांची-टोळी


07.  A crowd - of people – लोकांची-गर्दी


08.  A bunch - of grapes -द्राक्षांचा-घड,घोस  


09.  A bouquet - of flowers – फुलांचा-गुच्छ


10.  A zoo - of wild animals-जंगली प्राण्यांचे-प्राणीसंग्रहालय


11.  A troop - of soldiers- सैनिकांचे-पथक


12.  A squadron - of aeroplanes-विमानांचा-ताफा


13.  A pile - of cloth-कपड्यांचा- ढीग


14.  A hive - of bees – मधमाशांचे - पोळे  


15.  A heap-of wood- लाकडाचा-ढीग किंवा ढिगारा


16.  A file-of papers -कागदपत्रांची-फाइल


17.  A bunch - of bananas -केळीचा-घड


18.  A flock -of tourists- पर्यटकांचा-समूह


19.  A team - of players- खेळाडूंचा-संघ


20.  A range - of mountains-पर्वतांची-रांग


21.  A web - of spiders-कोळ्यांचे - जाळे


22.  A herd - of deer - हरणांचा-कळप


23.  A galaxy-of stars – तारकांची-आकाशगंगा


24.  A collection - of stamps – तिकीटांचा-संग्रह


25.  A cluster - of fruits  – फळांचा समूह -घोस


26.  A bunch - of keys-चाव्यांचा-जुडगा


27.  A fleet - of ships -जहाजांचा-ताफा


28.  A stock - of books - पुस्तकांचा-साठा


29.  A set - of tools-साधनांचा/उपकरणांचा-संच


30.  A quiver - of arrows - बाणांचा-भाता


31.  A herd - of cattle – गुराढोरांचा -कळप


32.  A flock - of birds -पक्ष्यांचा-थवा


33.  A family - of members having blood relation – रक्ताचे नाते असलेल्या सदस्यांचे-कुटुंब


34.  A chain - of mountains –पर्वतांची-शृंखला


35.  An army - of soldiers – सैनिकांची-फौज


36.  A gang - of labours- कामगारांची/श्रमिकांची-टोळी


37.  A string - of pearls- मोत्यांची-माळ


38.  A regiment - of soldiers-सैनिकांची-तुकडी


39.  An orchard - of fruit trees-फळझाडांची-बाग


40.  A heap - of stones – दगडांचा-ढीग किंवा ढिगारा


41.  A cache - of arms –शस्त्रास्त्राचा-साठा


42.  A board - of directors – संचालकांचे-मंडळ


43.  An album - of photos- फोटोंचा-अल्बम


44.  A society - of people-लोकांचा-समाज


45.  A forest -of trees -झाडांचे-जंगल  


46.  A century - of years – वर्षांचे-शतक


47.  An army - of ants – मुंग्यांची-फौज


48.  A pinch - of salt- चिमूटभर-मीठ


49.  A pack - of cards -पत्त्यांचा - गठ्ठा 


50.  A band of - musicians – संगीतकारांचे-पथक


51.  A code - of laws – कायद्याची-संहिता

Tuesday, December 14, 2021

उष्ण वाळवंटी प्रदेश- श्री ध्रुवास राठोड सर


 विषुववृत्ततापासुन २०॰ ते ३०॰ अक्षवृत्तांच्या दरम्यान हा नैसर्गगिक प्रदेश आढळतो..उ अफ्रिका,उ.अमेरिका,द.अमेरिका तसेच आशिया खंडात थरचे वाळवंटी भागात इत्यादी भाग येतो.

———————————————————————

नैसर्गिक वनस्पती:-

१)निवडुंग:-


निवडुंग हा वनस्पतींचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याची बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते त्यामुळे कोरड्या आणि किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते. निवडुंगाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत.

२)पाम:-


Monday, December 13, 2021

6वी -खडक व खडकाचे प्रकार स्वाध्याय


 अ)   नदीमध्येवाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कोठून येते

याविषयी माहिती घ्या.

उत्तर: नदीमध्ये पाणी प्रवाह सतत वाहत असतो. या पाण्याच्या प्रवाहामुळे नदी किनारी असलेल्या खडकांची झीज होते. पाण्याच्या वेगाने हे खडक फुटतात, त्यांचे छोटे छोटे तुकडे होतात. आणि हे तुकडे प्रवाह बरोबर वाहत जाताना त्यांचे बारीक कणांत रुपांतर होऊन बाळू तयार होते. अशा प्रकारे नदीमध्ये तयार झालेली वाळू ही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येते.

 ब) खालीलपैकी कोणकोणत्‍या वास्‍तू अग्निजन्य प्रकारच्या

खडकाने निर्माण केल्या आहेत ?


(१)            ताजमहाल      


(२)           रायगड किल्ला


(३)           लाल किल्ला


(४)          वेरूळचे लेणे


उत्तर:  रायगड किल्ला.


 


क)    फरक नोंदवा


१)    अग्निजन्य खडक व स्तरित खडक

अग्निजन्य खडक

स्तरित खडक

१)                अग्निजन्य खडक हे एकजिनसी दिसतात.

१)                स्तरित खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात.

२)               अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

२)स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात.

३)               अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात.

३)स्तरित खडक हे वजनाने हलके असतात.

४)             बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकांचे उदाहरण आहे.

४)वाळूचा खडक , चूनखडक, पंचाश्म, प्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहेत.

 

3) अग्निजन्य खडक व रुपांतरीत खडक

उत्तर:  

अग्निजन्य खडक

रुपांतरीत खडक

१)अग्निजन्य खडक कठीण असतात.

१)स्तरित खडक हे ठिसूळ असतात. 

२)अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

१)स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात.

३)अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात.

२)स्तरित खडक हे वजनाने हलके असतात.

४)बेसाल्ट खडक हे अग्निजन्य खडकांचे उदाहरण आहे.

४) वाळूचा खडक चूनखडकपंचाश्मप्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहेत.




ड) महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात.


१) मध्य महाराष्ट्र

उत्तर: बेसाल्ट व ग्रेनाईट

२)दक्षिण कोंकण

उत्तर: ग्रेनाईट आणि जांभा खडक

३)विदर्भ

उत्तर: ग्रेनाईट

२)  स्तरित खडक व रुपांतरीत खडक

उत्तर:

स्तरित खडक

रुपांतरीत खडक

१)स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात.

१)रुपांतरीत खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत.

२)स्तरित खडक हे वजनाने हलके असतात.

२)रुपांतरीत खडक हे वजनाने जड असतात.

३ )स्तरित खडक हे ठिसूळ असतात.  

३)रुपांतरीत खडक हे कठीण असतात.

४) वाळूचा खडक चूनखडकपंचाश्मप्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहे

४) नीस, संगमरवर, हिरा, स्लेट ही स्तरित खडकांची उदाहरणे आहेत

Friday, December 10, 2021

सहावी ६)जनपदे व महजनपदे स्वाध्याय


 स्वाध्याय

१. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) जनपदे म्हणजे काय?

उत्तर: छोटी छोटी राज्ये म्हणजे जनपदे होय.

२) महाजनपदे म्हणजे काय?

उत्तर: काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले.

(३) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?

उत्तर: राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली.

 ४)    वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली?

उत्तर: नंद राजांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरु केली.

—————————————————

प्रश्न २रा.सांगा पाहु

(१) आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता.

उत्तर: आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापला होता.


 


(२) जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे.

उत्तर: जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची ‘गणपरिषद’ असे.


 


(३) ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई.

उत्तर: ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला संधागार  म्हटले जाई.


 


(४) गौतम बुद्ध गणराज्यातील होते.

उत्तर: गौतम बुद्ध  शाक्य गणराज्यातील होते.


५)    चतुरंग सैन्य


उत्तर: पायदळ , घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य असे.

————————————————————

प्र.३. जोड्या जुळवा.


(१) संगिती)— परिषद


(२) धनानंद)— नंद राजा


(३) पाटलीग्राम —अजातशत्रू

—————————————————


प्र.४. भारतातील विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा.

उत्तर:

राज्ये

राजधानी

आंध्रप्रदेश

हैदराबाद

अरुणाचल प्रदेश

इटानगर

आसाम

दिसपूर

बिहार

पटणा

छत्तिसगढ

रायपूर

गोवा

पणजी

गुजरात

गांधीनगर

हरियाणा

चंदिगड

हिमाचल प्रदेश

सिमला

जम्मू काश्मीर

श्रीनगर

जम्मू

झारखंड

रांची

तेलंगणा

हैदराबाद

पश्चिम बंगाल

कोलकत्ता

उत्तराखंड

डेहराडून

उत्तरप्रदेश

लखनौ

त्रिपुरा

आगळताळा

तामिळनाडू

चैन्नई

सिक्कीम

गंगटोक

राज्यस्थान

जयपूर

पंजाब

चंडीगड

ओडीसा

भुवनेश्वर

नागालँड

कोहिमा

मिझोरम

ऐझवाल

मेघालय

शिलॉंग

मणिपूर

इंफाळ

महाराष्ट्र

मुंबई

मध्यप्रदेश

भोपाळ

केरळ

तिरुंअनंतपूरम

कर्नाटक

बेंगळूरू

 

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...