Sunday, October 24, 2021

नववी-इतिहास पाठ क्र.२स्वाध्याय

 



१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.


(१) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ................ होते.


(अ) राजीव गांधी


(ब) श्रीमती इंदिरा गांधी


(क) एच.डी.देवेगौडा


(ड) पी.व्ही.नरसिंहराव


उत्तर :- (अ) राजीव गांधी



(२) भारतीय हरितक्रांतीचे जनक.................................... होत.


(अ) डॉ. वर्गीस कुरीयन


(ब) डॉ. होमी भाभा


(क) डॉ. एम. एस. स्वामीनाथन


(ड) डॉ. नॉमेन बोरलॉग


उत्तर :-  (क) डॉ. एम. एस. स्वामीनाथन




(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.


(१) इंदिरा गांधी - आणीबाणी 


(२) राजीव गांधी - विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा 


(३) पी. व्ही. नरसिंहराव - आर्थिक सुधारणा


(४) चंद्रशेखर - मंडल आयोग)


उत्तर :- चंद्रशेखर - मंडल आयोग 




प्रश्न ३ रा : (अ) पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा.




कालावधी ======= प्रधानमंत्री 


१) पंडित जवाहरलाल नेहरू------------१९४७ ते १९६४ 

२) लालबहादूर शास्त्री-----------------१९६४ ते १९६६ 

३) इंदिरा गांधी -----------------------१९६६ ते १९७७

४) मोरारजी देसाई -------------------१९७७ ते १९७९ 

५) चरणसिंग-------------------------१९७९ ते १९८०

६) इंदिरा गांधी----------------------१९८० ते १९८४ 

७) राजीव गांधी ---------------------१९८४ ते १९८९

८) विश्वनाथ प्रताप सिंग------------१९८९ ते १९९०

९) चंद्रशेखर ------------------------१९९० ते १९९१

१०) पी.व्ही.नरसिंहराव--------------१९९१ ते १९९६

११) एच. डी. देवेगौडा---------------१९९६ ते १९९७

१२) इंदरकुमार गुजराल -------------१९९७ ते १९९८

१३) अटलबिहारी वाजपेयी ----------१९९८ ते २००४



प्रश्न ३ रा (अ) : पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१) जागतिकीकरण 


उत्तर :- जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करता येतो. जागतिकीकरणामुळे व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली. आर्थिक उदारीकरण घडून आले. उद्योग-व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. जागतिकीकरणामुळे अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत बदल घडून आले.


(२) धवलक्रांती :- 

उत्तर :- स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरु झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. डॉ. वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्धप्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली. सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्धप्रकल्प विकसित केला गेला. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध-उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली. डॉ. कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही 'धवलक्रांती' घडवून आणली.

३. (अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.

उत्तर :-  आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून १९७७ साली सत्ता हस्तगत केली. मोरारजी देसाई यांच्या नेतत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. परंतु, या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम २८ महिनेच टिकले.

२) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.

उत्तर :- १९८० च्या दशकात पंजाबमध्ये 'खलिस्तान' आंदोलन सुरू झाले. भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले.या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.

३) भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. 


उत्तर :- ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा -हास झाला होता. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. अनेक उद्योग उभारून, आधुनिकीकरण करून, भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती; म्हणून स्वातंत्र्यानंतर १९५० साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.

ब) पुढील प्रश्नाची २५ ते ३० शब्दात उत्तरे लिहा. 

१)जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ? र

उत्तर :- १९९१ साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या.

१) सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला.

२)पी. व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. 


३ )याच कळात रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले.


या सर्व घटनेमुळे जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले.


(२) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?


उत्तर :- अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाच्याद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली.


Thursday, October 21, 2021

स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल |


बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल 

——————————————————

प्रश्न १ला :  थोडक्यात उत्तरे लिहा.


(अ) कायिक विदारण म्हणजे काय ?

उत्तर :- खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे, म्हणजे 'कायिक विदारण' होय. अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात  कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.



(आ) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर :-  कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत.


(१) कार्बनन  :- पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. उदा. पाणी + कार्बन डायऑक्साइड = कार्बोनिक आम्ल

२) द्रविकरण  :- मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. तसेच द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.


(३) भस्मीकरण :-  ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर भस्मीकरण ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.


(इ) जैविक विदारण कसे घडून येते?

उत्तर :- जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळे, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडते.


ई) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :-  नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे विदारण होय. विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या

कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल म्हणजे विस्तृत झीज होय. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे मुख्य प्रकार आहेत

प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.


(अ) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.

चूक 

योग्य विधान :- भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होत असतो.


(आ) आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.

बरोबर


(इ) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.

बरोबर


(ई) खडकाचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

बरोबर 

(उ) अपपर्णातून जांभा खडकाची निर्मिती होते.

चूक 

योग्य विधान : बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते.



प्रश्न ४. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.

(अ) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात 

जैविक विदारण


(आ) खडकातील लोहावर गंज चढतो.

रासायनिक विदारण


(इ) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.

कायिक विदारण


(ई) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.

कायिक विदारण


(उ) ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.

कायिक विदारण


प्रश्न ५. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर :- पावसाळ्यात हमखास घडणारी एक घटना म्हणजे भूस्खलन. भूस्खलन म्हणजेच माती घसरून पडणे. ही माती डोंगरकड्यांवरून घसरते किंवा एखाद्या उतारावरून. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून माळीण गावातील ४४ घरं जमिनीत गाडली गेली. बस चालकाला माळीणगाव मातीच्या ढिगाऱ्यात गायब झाल्याचे समजले. त्याने ही बातमी प्रशासनाला कळवली. एकसारखा दमदार पाऊस, अरुंद रस्ता, वाहनांची व बघ्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून एनडीआरएफ टीम ४०० जवान, डॉक्टर्स, नर्सेस सहित माळीण येथे दाखल झाली. सहा दिवसानंतर १२९ मृतदेह बाहेर काढण्यात आले, तरीही आणखी मतदेह जमिनीखाली होती.जवळजवळ संपूर्ण गाव मातीखाली गायब होण्याची ही राज्यातील पहिलीच दुर्घटना. पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगर उतारावरील शेतीला, जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले.अमेरिकेच्या अंतराळ यंत्रणा नासाने या दुर्घटनेच्या अगोदरच्या दिवशी २९ जुलै रोजी या घटनेसंबंधी सूचना दिली होती. नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर २९ जुलै रोजी सायंकाळी या भागात भूस्खलन होण्याचा धोका उघड करत हाय अलर्ट दिला होता. भीमाशंकरच्या डोंगराळ भागात 'पर्पल कोड' हा अलर्ट दिला होता. पर्पल कोड तेव्हा दिला जातो जेव्हा भूस्खलन असलेल्या भागात १७५ मिमी हुन  आधिक पावसाची नोंद होते. या भागांमध्ये माळीण गावाचा देखील समावेश होता. परंतु भारतात मात्र या अलर्टवर लक्ष दिले गेले नाही.

Sunday, October 10, 2021

नववी इतिहास स्वाध्याय


 प्रश्न १ ला :  (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(१) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ............. येथे आहे.

(अ) पुणे

(ब) नवी दिल्ली

(क) कोलकता

(ड) हैदराबाद

उत्तर :- (ब) नवी दिल्ली

(२) दृकश्राव्य साधनांमध्ये .......... या साधनाचा समावेश होतो.

(अ) वृत्तपत्र

(ब) दूरदर्शन

(क) आकाशवाणी

(ड) नियतकालिके

उत्तर :- (ब) दूरदर्शन



(३) भौतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही.

(अ) नाणी
(ब) अलंकार
(क) इमारती
(ड) म्हणी
उत्तर :- (ड) म्हणी



(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

व्यक्ती विशेष जाल कूपर - टपाल तिकीट अभ्यासक

कुसुमाग्रज - कवी

 अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर

अमर शेख - चित्रसंग्राहक

उत्तर :- अमर शेख - चित्रसंग्राहक (कारण अमर शेख हे एक शाहीर होते )



 
२. टीपा लिहा. 

(१) लिखित साधने :

उत्तर :- वत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे इत्यादींचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. या साधनांच्या साहाय्याने आपल्याला ऐतिहासिक घडामोडी, सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, सामाजिक चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक परंपरा, समाजाची प्रगती इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती समजून घेता येते. म्हणूनच इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने ही जास्त महत्वाची आहेत.


(२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया १९५३ :

उत्तर :- नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्त्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. १९९० च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी 'उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे.



8 वी भूगोल स्वाध्याय

  


भूगोल पाठ क्र. १.) स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

प्रश्न १ .योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
१)पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो .एका तासात पृथ्वीवरील -  
उत्तर  -  15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात .

२) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी ....
उत्तर - दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो .

३)कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत
उत्तर  - 04 मिनिटांचा फरक असतो.

प्रश्न २ .भौगोलिक कारणे लिहा .
१)स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते .
उत्तर - मध्यान्हापर्यंत सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्यावेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते . मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखी असते .एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असल्याचे  गृहीत धरले जाते .

२)भारताची प्रमाण वेळ 82 अंश 30 'पूर्व रेखावृत्तावर स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे .
उत्तर - या रेखावृत्ता वरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्तावर च्या स्थानिक वेळांत एक तासांहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही . 82अंश 30 'पूर्व रेखावृत्त भारताच्या मध्यवर्ती भागातून जाते म्हणून स्थानिक वेळेनुसार ही प्रमाण वेळ निश्चित केली जाते .

३)जागतिक प्रमाण वेळ हि ग्रीनिच येथील स्थानिक वेळेनुसार  मानली जाते .
उत्तर - जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंश रेखावृत्त यासंदर्भात ठरवली आहे .इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून शुन्य रेखावृत्त जाते .विविध देशांच्या व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते .

  ४ )कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहे .
उत्तर - कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार 53 अंश 37 'पश्चिम रेखावृत्त ते141अनुश पश्चिम रेखावृत्त आहे . म्हणजे कॅनडा देशाचा अतिपूर्वेकडील व अति पश्चिमेकडील रेखावृत्तावर मधील अंशात्मक फरक सुमारे 88 अंशाचा आहे .अति पूर्वेकडील आणि अति पश्चिमेकडील स्थानिक वेळेनुसार 352 मिनिटांचा म्हणजेच पाच तास 52 मिनिटांचा फरक पडतो त्यामुळे कॅनडात एकच प्रमाण वेळ मानने गैरसोयीचे ठरते .


प्रश्न ३ .थोडक्यात उत्तरे लिहा .
१ ) 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा .
उत्तर -पूर्वेकडील रेखावृत्त वरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तावरील  स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावृत्त वरील स्थानिक वेळ च्या मागे असते . 60 अंश पूर्व रेखावृत्त व 30 अंश पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्त आंतील अंशात्मक फरक 90 अंश रेखावृत्त ते 60 अंश पूर्व रेखावृत्त या दोन रेखावृत्तां60 अंशाचा फरक + oअंश रेखावृत्त ते 30 अंश पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्त आंतील 30 अंशाचा फरक =90 कशाचा फरक .म्हणजेच 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे सहा वाजले असतील .

२)एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते ?
उत्तर -रेखावृत्तीय विस्तार अधिक असणार यात प्रदेशातील विविध भागांतील दैनिक व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्ता ती स्थानिक वेळ यात प्रदेशाची प्रमाण वेळ मानली जाते .एखाद्या प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ता च्या आणि अति पश्चिमेकडील रेखावृत्तावर च्या वेळां सुमारे दोन तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल तर अशा प्रदेशात सर्वसाधारणपणे एकच प्रमाण वेळ मानली जाते परंतु त्या स्थानिक वेळेत सुमारे दोन तासांहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळ यांचा वापर केला जातो .

३)ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाली तेव्हा साव पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा .
उत्तर -सावो पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्त आंतील अंशात्मक फरक127 अंश 30 ' .म्हणजे भारतात सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा साव पावलो येथे आदल्या दिवसाच्या रात्रीचे 9:30 झाले असतील .


प्रश्न ४ . मूळ रेखावृत्तावर 21 जून रोजी रात्रीचे दहा वाजले तेव्हा अ , ब , क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा .
 

ठिकाण

रेखावृत्त

दिनांक

वेळ

१२० 0  पूर्व

२२ जून

सकाळचे  

१६०0  पश्चिम

२१ जून

सकाळचे ११:२०

६० 0  पूर्व

२२ जून

पहाटेचे 2


प्रश्न ५ .खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ' क 'याठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृती खालील चौकटीत लिहा .
i)सूर्योदय  ii)मध्यरात्र  iii)मध्यान्ह iv)सूर्यास्त

 

6वी भूगोल स्वाध्याय लेखन

 


पाठ क्र.१) पृथ्वी आणि वृत्ते-इयत्ता सहावी

अ)  अचूक पर्यायासामोरील चौकटीत  अशी खुण करा.


१)पृथ्वीवर पूर्व- पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?

रेखावृत्त

आंतरराष्ट्रीय वाररेषा

अक्षवृत्ते

उत्तर: अक्षवृत्ते

 

२) रेखावृत्ते कशी असतात?

वर्तुळाकार

बिंदूस्वरूप

अर्धवर्तुळाकार

उत्तर: अर्धवर्तुळाकार

 

३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते?

कोनीय अंतर

गोलार्ध

वृत्तजाळी

उत्तर: वृत्तजाळी

 

४) उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत?

९०

८१

९१

उत्तर: ९०

 

५) पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोत्या वृत्तांमुळे तयार होतात?

 मूळ अक्षवृत्त व १८० ०   रेखावृत्त

 मूळ रेखावृत्त व १८० ०   रेखावृत्त

उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ते

उत्तर: ०० मूळ रेखावृत्त व १८०    रेखावृत्त

 

६) खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदूस्वरूपातील वृत्त कोणते?

विषुववृत्त

उत्तर ध्रुव

मूळ रेखावृत्त

उत्तर: उत्तर ध्रुव

 

७) पृथ्वीगोलावर ४५ उ. अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते.

एक

अनेक

दोन

उत्तर: अनेक

 

ब) पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.


१) मुळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.

उत्तर: अयोग्य . मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.


२) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.

उत्तर: अयोग्य. सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत.


३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत.

उत्तर: योग्य.


४) ८ ४६५|| उत्तर रेखावृत्त आहे

उत्तर: अयोग्य .  ४| ६५|| उत्तर अक्षवृत्त आहे.


५) रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात.

उत्तर: अयोग्य. रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात.

 

इ)पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्यासमोरील चौकटीत अशी खुण करा.

उत्तर:

पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय पृथ्वी आणि वृत्ते याचे प्रश्न उत्तर पृथ्वी आणि वृत्ते या पाठचा स्वाध्याय दाखवा पृथ्वी आणि वृत्ते धडा पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी भूगोल स्वाध्याय पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी धडा पहिला स्वाध्याय Pruthvi aani vrutte eyatta sahavi dhada pahila swadhya Paruthvi aani vrutte prashn uttare Pruthvi aani vrutte swadhya uttare

क) उत्तरे लिहा.


१)    उत्तर धृवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल?

उत्तर: उत्तर ध्रुवाचे अक्षांश ९० ० उ. अक्षवृत्त रेखांश अल्फा रेखावृत्त याप्रमाणे सांगता येतील. 


२)   कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते?

उत्तर: कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर ४७० असते.


३)   ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नवे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.

उत्तर: ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया इत्यादी.

 

४)  वृत्तजाळीचे उपयोग लिहा.

उत्तर: 

१)पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते.२) पृथ्वीवरील स्थान निश्चिती साठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरत आहे. ३) भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मप , विकीम्यापिया व इस्त्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमधे अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. ४) आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशा दर्शकामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.  

 

ड) पुढील तक्ता पूर्ण करा.

 

वैशिष्ट्ये

अक्षवृत्ते

रेखावृत्ते

आकार

वर्तुळाकार

अर्धवर्तुळाकार

माप/ अंतर

प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते.

प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते.

दिशा/ संबंध

दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते. म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.

दोन रेखावृत्तां,मध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर धोनही धृवांकडे हे अंतर कमी होत जाते.


—————————————————————:::::::::::::::::::————————————::———————————:::::::———————

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...