Sunday, September 19, 2021

6वी-इतिहास-स्वाध्याय


.)वैदिक संस्कृती- इयत्ता सहावी स्वाध्याय 

———————————————

प्र.१. पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा.

(१) वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया

उत्तर: गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा


 (२) वेदकालीन मनोरंजनाची साधने

उत्तर: वादन, गायन, नृत्य, सोंगट्याचा खळे, रथांच्या शर्यती आणि शिकार.


 (३) वेदकालीन चार आश्रम

उत्तर: ब्राम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम.

प्र.२. चूक की बरोबर ओळखा.

(१) यज्ञात म्हटले जाणारे मंत्र-ऋग्वेद

उत्तर: चूक


(२) अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद-अथर्ववेद

उत्तर: बरोबर


(३) यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद-सामवेद

उत्तर: बरोबर

 

प्र.३. एका शब्दात उत्तरे लिहा.

(१) वैदिक वाङ्मयाची भाषा......... .

उत्तर: संस्कृत


(२) विद् म्हणजे......... .

उत्तर: जाणणे


(३) गोधूम म्हणजे......... .

उत्तर: गहू 

(४) घराचा प्रमुख म्हणजे......... .

उत्तर: गृहपती


(५) श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत......... .

उत्तर: श्रेष्ठ


प्र.४. नावे लिहा.

(१) तुम्हांस माहीत असलेली वाद्ये ........................... .

उत्तर: वीणा, मृदुंग, ढोलकी, बासरी, टाळ, चिपळ्या,  डमरू, सतार, तबला.


(२) सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने ........................... .

उत्तर: हार, पैजण, अंगठी.


(३) सध्याची मनोरंजनाची साधने...........................

उत्तर: मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट.

 

प्र.५. थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता?

 उत्तर:

१)    गहू, सातू, तांदूळ या तृण धान्यांचा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश होता. यापासून ते विविध प्रकारचे पदार्थ बनवत असत.

२)   दुध, दही, लोणी, तूप, मध इत्यादी पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश होता.

३)   उडीद , तीळ, मसूर यांचाही आहारामध्ये समावेश होता.

 

(२) वेदकाळात गाईंची विशेष काळजी का घेतली जाई?

उत्तर:

१)घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना वैदिक प्राण्यांना विशेष असे महत्व होते.

२) वैदिक काळात गाईंचा विनिमयासाठी वापर केला जात असे त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती.

३)कोणी आपल्या गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई.

 

(३) संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती?

उत्तर:

१)    चौथा आश्रम म्हणजे ‘संन्यासाश्रम’ आहे.

२)   यामध्ये माणसाने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एका ठिकाणी राहू नये, असा संकेत होता. अशा प्रकारे संन्यासाश्रम मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती.

 

प्र.६. टीपा लिहा.

(१) वेदकालीन धर्मकल्पना

उत्तर:

१)    वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्यवारापाऊसवीजवादळेनद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते.

२)   त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत.


३)    त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला ‘हवी’ असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये ‘हवी’ अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ.

४) प्राणी मात्रांचे जीवन हाही सृष्टीचाक्राचाच भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर अनेक संकटे येतात.

५)  तसे होऊ नये म्हणून प्रत्येक मनुष्याने काळजी घ्यायला हवी. सर्वांनी सृष्टीचे नियम न मोडता वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे समजले जाई.

 

 (२) वेदकालीन घरे

उत्तर:

१)    वेदकाळातील घरे ही मातीची किंवा कुडापासून तयार केलेली असत.

२)   गवत किंवा वेलींचे जाड तट्टे विणून त्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड होय.

३)   या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरास्ठी ‘गृह’ किंवा ‘शाला’ हे शब्द वापरले जात.


(३) वेदकालीन शासनव्यवस्था

उत्तर:

१)    वेदकाळातील ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ‘ग्रामणी’ असे म्हटले जाई.

२)   ग्रामवसाहतींचा समूहाला ‘विश्’असे म्हटले जात असे. आणि त्या समूहाच्या प्रमुखास ‘विश्पति’ असे म्हणत.

३)   अनेक ‘विश्’ मिळून ‘जन’ तयार होत असे आणि हे जन नंतर जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावलेतेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद’ म्हटले गेले. ‘जन’च्या प्रमुखाला ‘नृप’ किंवा ‘राजा’ म्हटले जाई.

४)  ‘जन’ च्या उत्पन्नातील राजाचा ‘भाग’ गोळा करणारा भागदुघ असे.

५)  राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘सभा’‘समिती’, ‘विदथ’ आणि ‘जन’अशा प्रकारच्या चार संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत.

६)   ‘सभा’ आणि ‘विदथ’ या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास ‘सभा’ म्हटले जात असे.

७) तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस ‘समिती’ असे म्हणत.समितीमध्ये लोकांचा सहभाग असलेला पाहायला मिळतो.


——————————————

 ३.   हडप्पा संस्कृती इयत्ता सहावी स्वाध्याय 

————————————————————

१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे?

उत्तर: इ. स. १९२१ मध्ये पंजाबमधील रावी नदीच्याकाठी असलेल्या हडप्पा या ठिकाणी  उत्खनन सुरु झाले. प्रथम सुरू झालेम्हणून या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ हे नाव मिळाले.

 

(२) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे?

उत्तर: हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवलेएकमेकांत गुंतलेली वर्तुळेपिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे.

 

(३) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत?

उत्तर: हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमल चे कापड इजिप्तला पुरवत असत.

२. प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल?

जसे- स्थळाविषयी माहिती मिळवालप्रदूषण रोखणेऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत.

उत्तर:

        प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ. ज्या प्राचीन स्थळाला भेट दिली आहे त्याचा इतिहास काय आहे? त्याचे ऐतिहासिक महत्व काय आहे याबाबत माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन करू. त्या प्राचीन स्थळाच्या भौगोलिक परिस्थितीविषयी माहिती करून घेवू. त्या प्राचीन स्थळाची व्यवस्थितपणे जपणूक होत आहे की नाही याची माहिती घेऊन जर त्या प्राचीन स्थळाची नीट काळजी घेतली जात नसेल तर त्याबाबत तेथील स्थानिक प्रशासनाला सूचित करू. कचरा, प्रदूषण आणि प्राचीन स्थळाची जपणूक याबाबत माहितीचे फलक तयार करून ते त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था करू.

 

३. मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा.

उत्तरविद्यार्थ्यांनी येथे वहीत मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे स्नानगृहाचे चित्र काढायचे आहे.

 

४. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्यातक्त्यात लिहा.

उत्तर:

मुख्य पिके

पोशाख

दागिने / अलंकार

१)    गहू आणि सातू  (बार्ली)

स्त्री-पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे

वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. सुती आणि लोकरी कापडांचा वापर.

दागिने सोनेतांबेरत्ने तसेच शिंपले,

कवड्याबिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा,

अंगठ्याबाजूबंदकंबरपट्ट

 

५. एका शब्दात उत्तरे द्या. असे प्रश्न तुम्ही स्वत: तयार करा व त्यांची उत्तरे लिहा.

जसे- हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड.

१)    हडप्पा संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या  नावाने ओळखले जाते?

उत्तर: सिंधू संस्कृती.

२)   कोणत्या नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे?

 उत्तर: सिंधू

३)   प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडली आहे? 

उत्तर: लोथल

४) नांगरलेल्या शेताचा पुरावा कोठे मिळाला?

उत्तर: कालीबंगन

५)  हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोणत्या आकाराच्या होत्या?

 उत्तर: चौरस

४.  हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा.


वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...