सामान्यज्ञान प्रश्नावली क्र.२८
(संविधान दिन विशेष प्रश्नावली)
1. भारताचे ............... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
Answer: उपराष्ट्रपती
2. ................हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
Answer: राज्यसभा
3. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या............प्रतिनिधिंची नेमणुक राष्ट्रपती लोकसभेवर करु शकतात.
Answer: दोन
4. भारताच्या संसदेची निर्मिती........... केली आहे.
Answer: संविधानाने
5. महाराष्ट्रातुन लोकसभेत ............. खासदार निवडून दिले जातात.
Answer: ४८
6. दर ...............वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले १/३ सदस्य निवृत्त होतात.
Answer: दोन
7. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ............. देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात.
Answer: अर्थमंत्री
8. लोकसभा सदस्यत्वासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागते?
Answer: 25
9. घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ रोजी कोणत्या ठिकाणी पार पाडले?
Answer: दिल्ली
10. घटना समितीच्या सल्लागारपदी कोण होते?
Answer: बी.एन.राव