Sunday, May 22, 2022

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════

 🦚 ❍ *संकलन*❍ 🦚

*श्री.ध्रुवास ममराज राठोड*

    (सहा.शिक्षक)

 *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव जि.जळगांव* 

Mob.no.8600746897

 ══════════════════

❍ *आजचे वाचनीय पुस्तक* 

✍︎ *शीर्षक :-*'श्यामची आई '

✍︎ *लेखक :-* साने गुरूजी 

✍︎ *आवृत्ती :-* मराठी 

 

 *खालील फ्लिप लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचन करावे* 👇

https://online.fliphtml5.com/wjszp/zdiu/#p=1 


▬▬▬📔📔📔📔▬▬


📖 *वाचन छंद-0️⃣2️⃣*📖     ════════════════

 🦚 ❍ *संकलन*❍ 🦚

*श्री.ध्रुवास ममराज राठोड*

           (सहा.शिक्षक)

 *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव जि.जळगांव* 

mob.no.8600746897

 ══════════════════

📔 *आजचे वाचनीय पुस्तक* 

✍︎ *शीर्षक :-* बटाट्याची चाळ

✍︎ *लेखक :-* पु.ल.देशपांडे

✍︎ *आवृत्ती :-* मराठी 

 

 *खालील फ्लिप बुकच्या लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचन करावे* 👇

https://online.fliphtml5.com/wjszp/xcna/#p=2


▬▬▬📔📔📔📔▬▬


📖 *वाचन छंद-0️⃣3️⃣*📖     ════════════════

 🦚 ❍ *संकलन*❍ 🦚

*श्री.ध्रुवास ममराज राठोड*

           (सहा.शिक्षक)

 *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव जि.जळगांव* 

mob.no.8600746897

 ══════════════════

📔 *आजचे वाचनीय पुस्तक* 

✍︎ *शीर्षक :-* ययाती

✍︎ *लेखक :-* वि.स.खांडेकर

✍︎ *आवृत्ती :-* मराठी 

 

 *खालील फ्लिप लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचन करावे* 👇

https://online.fliphtml5.com/wjszp/wnis/


▬▬▬📔📔📔📔▬▬


📖 *वाचन छंद-0️⃣4️⃣*📖     ════════════════

 🦚 ❍ *संकलन*❍ 🦚

*श्री.ध्रुवास ममराज राठोड*

           (सहा.शिक्षक)

 *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव जि.जळगांव* 

mob.no.8600746897

 ══════════════════

📔 *आजचे वाचनीय पुस्तक* 

✍︎ *शीर्षक :-* कोल्ह्याट्याचं पोर

✍︎ *लेखक* किशोर शांताबाई काळे

✍︎ *आवृत्ती :-* मराठी 

 

 *खालील फ्लिप लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचन करावे* 👇

https://online.fliphtml5.com/wjszp/achn/


▬▬▬📔📔📔📔▬▬


📖 *वाचन छंद-0️⃣5️⃣*📖     ════════════════

 🦚 ❍ *संकलन*❍ 🦚

*श्री.ध्रुवास ममराज राठोड*

           (सहा.शिक्षक)

 *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव जि.जळगांव* 

mob.no.8600746897

 ══════════════════

📔 *आजचे वाचनीय पुस्तक* 

✍︎ *शीर्षक :-* फकीरा

✍︎ *लेखक* अण्णा भाऊ साठे

✍︎ *आवृत्ती :-* मराठी 

 

 *खालील फ्लिप लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचन करावे* 👇

https://online.fliphtml5.com/wjszp/ipdl/


▬▬▬📔📔📔📔▬▬

📖 *वाचन छंद-0️⃣6️⃣*📖     ════════════════

 🦚 ❍ *संकलन*❍ 🦚

*श्री.ध्रुवास ममराज राठोड*

           (सहा.शिक्षक)

 *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव जि.जळगांव* 

mob.no.8600746897

 ══════════════════

📔 *आजचे वाचनीय पुस्तक* 

✍︎ *शीर्षक :-* मन मे हैं विश्वास

✍︎ *लेखक* विश्वास नागरे पाटील

✍︎ *आवृत्ती :-* मराठी

 

 *खालील फ्लिप लिंकवर क्लिक करून पुस्तक वाचन करावे* 👇

https://online.fliphtml5.com/wjszp/sbuv/

▬▬▬📔📔📔📔▬▬





Tuesday, May 3, 2022

🦚साप्ताहिक उपक्रम ज्ञानज्योती-०१🦚


🦚साप्ताहिक ज्ञानज्योती-०१🦚
      ◆ *महाराष्ट्र माझा*

::::::::------------------------::::::::

      *श्री ध्रुवास राठोड,सर*

         मो.नं.८६००७४६८९७

  (शासकिय नि.शाळा,चाळीसगांव)

      ◆ *महाराष्ट्र माझा* ◆


📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

 ★महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०

★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई 

★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर 

★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६ 

★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५

★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६

★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७

★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६

★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७

★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३

★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४

★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८

★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५

★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३

★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००

★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%

★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग

★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )

★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )

★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे 

★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग

★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर 

★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर 

★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे

★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर

★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग 

★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%

★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा

★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा

★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत 

★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु

★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी

★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)

★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)

★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)

★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा.उध्दव ठाकरे

★ महाराष्ट्राचे राज्यपाल : भगतसिंग कोशारी

★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा 

★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा 

★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)

★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)

★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला

★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर 

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर

★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर

★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी

★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)

★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा

★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण

★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश

★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई

★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)

★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)

★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)

★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)

★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)

★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर

★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)

★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)

★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)

★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी

★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)

★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)

★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)

★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश

Friday, January 28, 2022

भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास

 स्वातंत्र्यप्राप्तीपासूनचा आपल्या अर्थव्यवस्थेचा इतिहास



भारताच्या स्वातत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या आर्थिक धोरणावर ब्रिटिश राजवटीमधील अनुभवांचा बराच परिणाम दिसून येतो. अनेक वर्षांच्या परकीय राजवटीमुळे ब्रिटिशांची धोरणे ही पिळवणुकीसमान होती असे सुरुवातीच्या भारतीय नेत्यांचे व धोरणकर र फेबियन समाजवादाचाही बराच प्रभाव होता. त्यामळे भारतातील सुरुवातीची आर्थिक धोरणे स्वदेशी उद्योगांना सरकारकडून संरक्षण यासारख्या (Protectionism) समाजवादी कल्पनांवर आधारित होती. आयातीला स्वदेशी पर्याय (Import substitution), सरकारच्या मदतीने औद्योगिकीकरण, रोजगारामध्ये तसेच आर्थिक बाजारांमध्ये सरकारी नियंत्रण, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उद्योग, उद्योगधंद्याचे नियंत्रण आणि आर्थिक योजनांचे केंद्रीकरण अशा गोष्टींचा यामध्ये समावेश होता.भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी संख्याशास्त्रज्ञ प्रसंत चंद्र महालनोबीस यांच्या मदतीने सुरुवातीच्या आर्थिक धोरणांना दिशा दिली. या धोरणांचे चांगले परिणाम धोरणकर्त्यांना अपेक्षित होते. कारण ह्या धोरणांमध्ये खाजगी व सरकारी दोन्ही क्षेत्रांचा सहभाग होता. आणि अतिशय टोकाच्या सोविएत-पद्धतीच्या केंद्रित नियंत्रणापेक्षा ही पद्धत अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष सरकारी नियंत्रणावर आधारित होती.परंतु, एकीकडे भांडवल आणि तंत्रज्ञानावर आधारित जड-उद्योगांवर लक्ष केंद्रीत करताना दुसरीकडे अकुशल कामांवर आधारित लघुउद्योगांना अनुदान देण्याच्या या धोरणांवर मिल्टन फ्रिडमन ह्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने टीका केली. फ्रिडमनच्या मते, ह्या धोरणांमुळे भांडवल आणि परिश्रम दोन्हीचा अपव्यय होतो, तसेच छोट्या उद्योजकांची वाढ खुंटते.

१९४७-८० मधील भारताचा सरासरी आर्थिक विकासदर हा भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या बाकी अशियाई देशांपेक्षा आणि मुख्यत्त्वे आशियाई वाघ म्हणल्या जाणाऱ्या देशांपेक्षा बराच कमी होता. ह्या तुलनात्मक कमी विकासदराची तथाकथित "हिंदू विकासदर" (Hindu rate of growth) अशी कुचेष्टा केली गेली.

१९८० च्या दशकाच्या अखेरीस राजीव गांधींच्या सरकारने उद्योगांवरचे नियंत्रण कमी करण्यास सुरुवात केली. सरकारने किमतींचे नियमन करणे कमी केले आणि उद्योगांवरचा करही कमी केला. यामुळे विकासदर वाढण्यास सुरुवात झाली, परंतु त्यामुळे सरकारी महसूलातील तूट वाढली आणि सरकारच्या चालू खात्याचे स्वास्थ्यही बिघडायला लागले. शिवाय त्या वेळचा भारताचा व्यापारातील मोठा भागीदार असलेल्या सोविएट युनियनच्या अस्तामुळे आणि आखाती युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे भारतापुढे आयात-निर्यातीच्या समतोलाचा (Balance of payments) मोठा प्रश्न निर्माण झाला. बाह्य देशांकडून घेतलेले कर्ज भारत वेळेवर परत फेडू शकेल की नाही अशी शंका उत्पन्न झाली.ह्याला प्रतिसाद म्हणून तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंग ह्यांनी आर्थिक उदारीकरण करण्यास सुरुवात केली. आर्थिक सुधारांबरोबरच परवाना राजवट (गुंतवणूक, औद्योगिक व आयात परवाने) बंद झाली आणि सार्वजनिक उद्योगांची मक्तेदारी संपून विविध क्षेत्रांमधील परकीय व खाजगी गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला. तेव्हापासून सत्ताधारी पक्ष कोणताही असला तरी सुधारांची सर्वसाधारण दिशा तीच राहिली आहे. परंतु, कोणत्याही पक्षाच्या सरकारने शेतीच्या अनुदानातील घट अथवा कामगार कायद्यातील सुधार ह्यासारख्या वादग्रस्त मुद्द्यांचा सामना करणे टाळले आहे. १९९० नंतर विकसनशील देशांमधील सर्वात समृद्ध अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारत ओळखला जाऊ लागला आहे. यानंतरच्या काळात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर भारतातील सरासरी आयुर्मान व साक्षरता ह्यांसारख्या इतर अर्थ-सामाजिक परिमाणांमध्येही सुधारणा होताना दिसत आहे.१९९८ च्या अणुचाचण्यांनंतर भारताला इतर देशांकडून मिळणाऱ्या मदतीवर बंधने लादण्यात आली. ह्यामुळे भारताच्या पत दर्जामध्ये (Credit rating) घसरण झाली. पण त्यानंतर पत दर्जा ठरवणाऱ्या‍ एस ॲंड पी आणि मूडीज ह्या संस्थानी भारताला परत गुंतवणूकीसाठीची पातळी हा पत दर्जा दिला आहे. २००३ मध्ये गोल्डमन सॅक्स ह्या कंपनीने असे अनुमान केले की भारताचे वार्षिक सकल उत्पन्न २०२० मध्ये फ्रांस आणि इटलीला मागे टाकेल, जर्मनी, रशिया आणि युनायटेड किंग्डम ला २०२५ पर्यंत मागे टाकेल तर जपानला २०३५ पर्यंत मागे टाकेल.

Friday, January 14, 2022

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

 स्वाध्याय 

प्र.१. सांगा पाहू.

(१) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे.

उत्तर: कुशाण


(२)  कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर.

उत्तर: कानिष्कपूर


(३)  वीणावादनात प्रवीण असलेला राजा.

उत्तर: समुद्रगुप्त


(४)   कामरूप म्हणजेच.

उत्तर: प्राचीन आसाम

.२. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्यासाम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा.

उत्तर: १) दिल्ली २) मगध ३) पटणा

 

प्र. ३. चर्चा करा व लिहा.

(१)    सम्राट कनिष्क

उत्तर: कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले काम्पूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने ‘बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’ हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता.


(२)    मेहरौली येथील लोहस्तंभ

उत्तर: दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात ‘चंद्र’ नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहेअसे मानले जाते.

 

प्र.४. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा.

उत्तर:

१)    बाणभट्ट : हर्षचरित

२)   अश्वघोष : बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’

३)   मिनँडर : ‘मिलिंदपञ्ह’

 

प्र. ५. गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा.

उत्तर:

मुद्दे

गुप्त राजघराणे

वर्धन राजघराणे

संस्थापक

श्रीगुप्त

प्रभाकरवर्धन

राज्यविस्तार

आसामपासून व पंजाब पासून ते कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टी असलेला प्रदेश तसेच माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र 

उत्तर दिशेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी आणि पुरेल आसाम आणि पश्चिम दिशेला गुराजारात पर्यंतचा प्रदेश.

कार्य

समुद्र गुप्ताने विविध प्रतिमा असलेलेई नाणी तयार केली होती.

व्यापाराची भरभराट झाली. इतर धर्मांना आश्रय दिला.



प्र.६ . पुढील शब्दकोडे सोडवा.

उभे शब्द

२. ¬¬¬¬¬ याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभलेखामध् आढळते.

३. मेहरौली लोहस्तंभावर ¬¬ नावाच्या राजाचा उल्ख ले आढळतो.

५. पुष्यवर्मन याने ¬¬¬¬ चे राज्य स्थापन केले.

७. ¬¬¬¬¬ याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता.

८.इंडोग्रिक  राजांमधील प्रसिद्ध राजा ¬¬¬¬.

आडवे शब्द

१. ¬¬¬¬¬¬¬ याने गुप्तांचे साम्राज्य वायव्कडे ये वाढवले.

४. हरवर्धनाचे एक संस्कृत नाटक ¬¬¬¬¬

६. गुप्त राजघराण्याचा संस्थापक ¬¬¬

९. ¬¬¬¬ हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला.

१०. दुसऱ्या चद्रगुंप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध  भिक्षु ¬¬¬¬

११. कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य ¬¬

उत्तर:

दु

रा

चं

द्र

गु

प्त

 

 

 

मु

 

द्र

 

 

 

 

 

 

द्र

 

 

प्रि

र्शि

का

श्री

गु

प्त

 

 

 

 

 

 

प्त

 

 

 

 

 

रु

 

 

 

र्ष

 

 

मि

 

 

प्र

भा

ती

 

नँ

 

 

 

 

 

र्ध

 

 

 

 

हि

या

 

 

वाचन छंद उपक्रम

 📖 *वाचन छंद-0️⃣1️⃣*📖     ════════════════  🦚 ❍ *संकलन*❍ 🦚 *श्री.ध्रुवास ममराज राठोड*     (सहा.शिक्षक)  *शासकिय निवासी शाळा, चाळीसगांव ज...